Thursday, July 05, 2007

पायाखालुन अलगद सरकत जाणारी वाळू
किंवा त्या वाळूचा हात धरून
तिला ओढत नेणारी लबाड लाट
यातलं नेमक आपलं कोण ?
लाट किंवा वाळू
किंवा मग याही पलीकडे
आपल्या तिघांचा खेळ बघणारा समुद्र नक्की कोण
या खेळाचा पंचच जणू..
बाकी खरं काही असो.
पायाखालून सरकत जाणाऱ्या वाळूचा स्पर्श मात्र
तिच्या पहिल्या स्पर्शासारखाच अगदी नाजुक
आणि हवाहवासा वाटणारा..


संतोष (कवितेतला)

No comments:

Post a Comment