Thursday, July 05, 2007

कविता करायला प्रेमात
पडावंच लागतं असं नाही
गुलाबाचा वास घ्यायला ते
खुडावंच लागतं असं नाही

मी जे बोलतोय ते तुम्हांस
कदाचित खरं वाटत असावं
मलासुद्धा हे असंच बोलणं
थोडसं बरं वाटत असावं

तरीसुद्धा सांगतो असं नसतं
असं कधीच होत नाही
पाखरू बनल्याशिवाय आपणांस
उडता कधीच येत नाही

माझ्यासारखे काही जण मग
कवितेसोबतच जगतात
प्रेमात हरल्यावरही काही जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर पूर्णपणेच
वेड्यासारखं वागतात

No comments:

Post a Comment