Friday, October 10, 2008

ढग

लहानपणी माईला असंच एकदा विचारलं ,

माई ते ऊंच तिकडं आकाशात -

काळं-पांढर कापसासारखं काय उडतंय ?

माई म्हणाली ते ढग आहेत

त्यात पाणी असतं .

नंतर एकदा माईच्या डोळ्यात पाणी पाहून-

मी विचारलं ,

माई तूझ्या डोळ्यात -

काळे-पांढरे ढग आहेत ?

माई हसून म्हणाली,

खूप वेळ ऊंच आकाशात पहिलं की -

डोळ्यात ढग जमा होतात !


स्त्रोत: -पत्र

No comments:

Post a Comment