Monday, July 07, 2008

तुझ्या माझ्यासवे... -- संदीप खरे


तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला सुचवायचा पाऊसही

कशी भर पावसात आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊस ही
-- संदीप खरे

No comments:

Post a Comment