Wednesday, January 16, 2008

वणवा..

घर बांधण्यासाठी
आयुष्य वेचतो आम्ही..
वस्त्या जाळताना
विचार करत नाही..

सामान्य माणसांच्या
होतात कत्तली येथे..
आजही भाषणातून
माणूसकी जपली जाते.

शब्दांच्या ठिणग्यांनी ..
लावतात आग काही
आगीस धग देते..
तेल आपलेच काही..

वणवा होऊन जाते
एकांकिका कुणाची
इतिहास लिहून घेतोय
शोकांतिका जगाची..

आनंद माने
('आनंद' या शब्दाविन जगणे अशक्य.... तुम्हालाही )

No comments:

Post a Comment