Thursday, December 27, 2007

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे

गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे

वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे

होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे

-- संत तुकाराम

No comments:

Post a Comment