Monday, December 03, 2007

शब्द चार ओळीत पकडताना...
प्रतिबिंब मनाचे मांडताना....
कागदालाही रडू फ़ुटले आज
माझे दु:ख वाटताना.....

दिवसा उजेडात स्वत:ला सावरताना...
सायंकाळी सुर्य अस्ताला जाताना...
अश्रुही अपुरे पडलेत आता
काळजाची आग विझवताना....

तुझ्या सोबत हसताना....
एखादा अश्रु पुसताना....
हर-एक क्षण जातो आता
आठवणीची राख गोळा करताना...

भावना तुला सांगताना...
मन मोकळे करताना....
बधिर मात्र तु झाली होतीस
माझा अंत पाहताना....

---- हर्षल पाटील

No comments:

Post a Comment