Friday, November 30, 2007

आयु्ष्यातील काही क्षण
खूप काही देऊन जातात.

काही काही क्षण मात्र
खूप काही घेऊन जातात.

माझ्या आयु्ष्यातील काही क्षण
सगळी सुख घेऊन गेले.

उरली सुरली दु:खे मात्र
माझ्यासाठी ठेवून गेले.

सहजपणे माझ्या दु:खांकडे
मी सुख म्हणून पाहू लागले.

तसं मी मनी धरता
तेही सुख सोडून गेले.

मग मात्र अस्वस्थ मनाने
सारं सारं सोशित गेले.

पाऊस पडून गेलेल्या आभळगत
मन रित करीत गेले.

- सोनाली

No comments:

Post a Comment