नयनास नयन मिळता मन गहिवरलेले,
निःशब्द ओठांतुनि बोल भावनांचे उमगले..../०/
दोन थेंब अनावर आवेगाचे डोळ्यांत दाटले,
पापण्यांतुनि गळताच मोती होऊन पडले...
निःशब्द ओठांतुनि बोल भावनांचे उमगले..../१/
लोचनांत परस्परांच्या प्रेमबिंदु साठलेले ,
नजरभेट होताच झर झर पाझरू लागले...
निःशब्द ओठांतुनि बोल भावनांचे उमगले..../२/
वाटे बरसत रहावेत असेच अमुचे डोळे ,
स्वर्गातही नसावे यासम अमृत साठलेले...
निःशब्द ओठांतुनि बोल भावनांचे उमगले....
No comments:
Post a Comment