Friday, October 26, 2007

खरंच कळत नाही आता मला
तुझ्या डोळ्यात खरंच माझ्यासाठी प्रेम होतं
का ते मा माझ्याच डोळ्याचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात पाहीलं होतं

खरंच कळत नाही आता मला
मी असा कसा वागलो
सगळ्यांना सांगता सांगता
मीच एकतर्फी प्रेमात पडलो....
--श्रीकांत लव्हटे

नेहमी हे असेच होते
वेळ निघुन गेल्यावर
मन भानावर येते
बोलायचे तेव्हा बोलणे होत नाही
नी ती गेल्यावर डोळ्यात रडू येते.....
--श्रीकांत लव्हटे

No comments:

Post a Comment