Friday, September 14, 2007

एक झुळुक हलकीशी

एक झुळुक हलकीशी.....
सळसळती पाने
तुझ्या आठवणींचा दरवळ
तितक्याच वेगाने
आला सोसाट्याचा वारा
पान पान सैरावैरा........
सांडलेल्या दु:खाने
ओलांडला किनारा
आता निनादतील
बघ बेमोसम ढग
भिजेलही कदाचीत
तुझे कोशातील जग

माझे काय........आता मी
पूर्ण पूर्ण रीता!
हवे तर केव्हा ही डोकाव
येता जाता!

बेमोसम पाऊस.....एक झुळुक हलकीशी....

-रमेश पोतदार

No comments:

Post a Comment