Monday, September 03, 2007

रात्र अर्धी सरली
चंद्र नभी आला
शुभ्र चांदण्याची
भिती अंधाराला

संथ पाण्यात पडले
चंद्राचे प्रतिबींब
कांचनमय झालेला
पाण्याचा थेंब थेंब

पानांच्या झरोक्यातुन पडले
चांदण्याचे कवडसे
चांदणे प्यायला
पान् पान आसुसले

मनातल्या चकोराला
ओढ चांदण्याची
महिन्यातून एकदाच का येते
वेळ चांदण्याची

-- हेमंत मुळे

No comments:

Post a Comment