Monday, August 27, 2007

कधीतरी हे मेघ जमावे माझ्यासाठी
मातीनेही गंध लुटावा माझ्यासाठी ..

दोन तळी अश्रूंची भरली त्यात मजेने
चंद्राने विरघळून जावे माझ्यासाठी...

प्रेमाने मज कवळून घेण्या , जीवनलतिके,
कधीतरी तुज हात फुटावे माझ्यासाठी...

आकाशातिल आनंदाच्या हिंदोळ्यांनो ,
ह्या बाजुने कधी झुलावे माझ्यासाठी .....

श्वासांची पडतील फुले हि जिथे उद्याला
तिथे तुझे पाऊल असावे माझ्यासाठी....

योगदान : रेशमा


No comments:

Post a Comment