Monday, August 13, 2007

आनंदात राया
दंग झाली काया
पुढे मागे माया
नुरली काही

कशाचा कशाला
मेळ ना राहीला
आतंकात गेला
जन्म अर्धा

बघती हे डोळे
स्वप्नांची वारुळे
फ़ुत्कारही काळे
सुस्तावले

कोणापुढे गावे
काय मी मागावे
कसे ते सांगावे
खुळे पण

मन म्हणे आता
नेमेचीच चिंता
रचुनिया चिता
निद्रा घ्यावी

- सुनिल सामंत
०१।०५।२००७

No comments:

Post a Comment