Wednesday, August 01, 2007

सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण,
पाण्यात राहुन माश्याची मग भागत नाही तहान.

स्वप्न सत्त्यात आणता आणता दमछाक होते खुप,
वाटी-वाटीने ओतलं तरी कमीच पडतं तुप.

बायको-पोरांसाठी म्हणे चले हा खेळ,
पैसा आणुन ओतेन म्हणतो पण मागु नकाअ वेळ.

करिअर होतं जीवन मात्र,जगायवच जमेना तंत्र,
बापची ओळख मुलं सांगती पैसा छापायचं यंत्र.

चुकुन सुट्टी चेतलीच तर स्वत: पाहुणा स्वत:च्याच घरी,
दोन दिवस कौतुक होतं,नंतर डोकेदुखी सारी.

मुलच मग विचरु लगतात,का हो आजुन घरी?
त्यांचा ही दोष नसतो,त्यांना सवयच नसते ही न्यारी.

क्षणैक औदसींन्य येतं,मात्र पुन्हा सुरु होतं चक्र,
करिअर-करिअर दळण दळता,स्वास्थ्य होतं वक्र.

सोनेरी वेली वढत जातात,घरा भोवती चढलेल्या,
आतुन मात्र मातीच्या भींती कधीही न सारवलेल्य.

आयुश्याच्या संध्याकाळी मग एकदम जणवु लागत काही,
धावण्याच्या हाट्टापाई श्वासच मुळी घेतला नाही.

सगळ काही पहाता पहाता आरशात पाहण राहुन गेलं,
सुखाची तहान भागता भागता समाधान दुर वाहुन गेलं.

सुखाची तहान भागता भागता समाधान दुर वाहुन गेलं----

No comments:

Post a Comment