Friday, July 20, 2007

कसा ओळखू कसा कुणाला?
"मीच" मला गवसला नाही...
स्वभाव जोखत बसलो आणि
भाव मनीचा दिसला नाही....

जळुनिया पुनवेत गेलो
चांदण्यांचा रोष होता;
तुझी चुक नाही माझ्या
भावनांचा दोष होता...

चांदण्यान्नी घात केला
ती पौर्णिमेची रात होती;
मार्ग माझा दाखवाया
काजव्यांची साथ होती...

आयुष्याने धडे दिल्यावर
कविता दूर राहू लागल्या
त्यांच्या कवीचं परकं होणं
मुकयामुकयाने पाहु लागल्या...


No comments:

Post a Comment