Monday, July 02, 2007

साठलेल्या पाण्यामधे गोल थेंबाची ती चाल



पावसाच्या त्या सरी,ती दबक्या मधली पोरं
सरी ओसरुन झाल्यावर धुउन निघालेल वार ।

पानावरुन ओघळनारया टपोरया थेंबाचे ते मॊती
ते वाहणारे पाणी,ती दरवळलेली माती ।

साठलेल्या पाण्यामधे गोल थेंबाची ती चाल
पत्र्यावरचा आवाज तो मधुर सुरताल ।

थंड पाण्याचा तो झरा मला सुचलेल्या ओळी
शेजारी मोकळे ते रान , त्यात शांत गाय भोळी ।

गावापासुन दुर नुसत , गर्दीच ते रान
गावमध्ये जपुन ठेवलय मी......
..............................आठवणींच पिंपळपान ।

No comments:

Post a Comment