Saturday, June 09, 2007

कोणितरी जवळ असावसं वाटतं

आपलंही स्वतःचं कोणी असावसं वाटतं


एखाद्या संध्याकाळी ढग दाटून येतात

मन असंच आनंदात भिजतं

सर्वान्ना हवासा छान पाऊस पडतो

मलाही मग कोणातरी सोबत चिंब भिजावसं वाटतं


एखादं गाणं ऐकताना एखादा स्वर भावून जातो

मनाला शांत करणारा गारवा देऊन जातो

अशावेळी दाद देणारं कोणी हवं असतं

कारण मलाही असं शांत व्हायचं असतं


कधितरी दिवस असाच वाईट जातो

एकट्या या मनाला आणखी दुखावून जातो

अशावेळी कुशीत शिरुन रडावंसं वाटतं

माझं तेव्हा कोणितरी असावंसं वाटतं


अशातंच शेवटी निघायची वेळ येते

कोणितरी थांबवणारं असावंसं वाटतं

निघून गेल्यावर रडणारं कोणितरी असावंसं वाटतं

म्हणूनच मला दुकटं व्हावंसं वाटतं

No comments:

Post a Comment