Tuesday, June 26, 2007

मी असतो कधी इथे
कधी हरवतो तिथे
स्वप्नांत वसलेला तो
माझा गाव नाही

डोळ्यात असती पाणी
हसू चेहृयावरती
फसवण्याचा तुम्हाला हा
माझा डाव नाही

होतो कसा मी
आहे कसा मी
शोधूनी जाणले अजुनी
मजला नाव नाही

सांगू कसे तुम्हाला
पटणार तसे नाही
मी कसा अजुनी
मजला च ठाव नाही

--पंकज तिजोरे

No comments:

Post a Comment