Monday, June 18, 2007

बघ दिसतो का तुला.....

आज मी हरवलो,
न सापडण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी भांडण्यासाठी,

थोडा आधी गहीवरलो,
न रडण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी हसण्यासाठी,

दुर देशी निवर्तलो,
न परतण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी झुरण्यासाठी,

पाताळी भुत गाडलो,
न अंकुरण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी फुलण्यासाठी,

तुझ्यात मी अवतरलो,
न विसरण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी आठवण्यासाठी

क्षणात तुझ्या सामावलो,
न संपण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी जगण्यासाठी......

अंतरी अंमळ उधाणलो,
न हारण्यासाठी,
बघ दिसतो का तुला,
मी जिंकण्यासाठी

No comments:

Post a Comment