Tuesday, June 12, 2007

ह्या खांद्यावर डोकं ठेवून तिला रडावंसं वाटावं .
काँलेजनंतर मागे थांबून सोबत बसावंसं वाटावं .

ज्या स्वप्नांमधे माझ्या सगळ्या रात्री जागतात .
त्या स्वप्नांमधे हरवून तिलाही जागावंसं वाटावं .

माझे आसू पुसून तिनं आमच्या सुखात हसावं .
कधीतरी वाटतं यार, आपलंही कुणीतरी असावं..!

छोट्या छोट्या गोष्टींमधे खोटं खोटं चिडावं .
पण, भेटीनंतर निघते म्हणताना तिचं पाऊल अडावं .

बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा ,
तिनं माझ्या प्रेमात अगदी आकंठ बुडावं .

ह्या छोट्याश्या स्वप्नानं एकदाच खरं व्हावं .
नेहमीच वाटतं यार, आपलंही कुणी असावं..!

No comments:

Post a Comment