Friday, April 20, 2007

अहो, ऐकलंत का?

लग्नंतर बायका (आपापल्या) नवऱ्यांना कशा हाका मारतात, त्यांत कसा बदल होत जातो, पाहा!

पहिले वर्ष : अहो!

दुसरे वर्ष : अहो, ऐकलंत का?

तिसरे वर्ष : अहो, बंटीचे बाबा!

चौथे वर्ष : अहो, बहिरे झालात काय?

पाचवे वर्ष : कान फुटलेत की काय तुमचे?

सहावे वर्ष : इकडे येताय की मी येऊ तिकडे?

सातवे वर्ष : कुठे उलथलाय हा माणूस देव जाणे!



No comments:

Post a Comment