Friday, April 27, 2007



काय सांगू मित्रांनो
काल रात्री कमाल झाली
स्वप्नामध्ये ती आली
आणि एकदम धमाल उडाली

होत माझा वाढदिवस
म्हणूनी मला ती भेटली
पांढरा शुभ्र रंग तीचा
पाहुनी पप्पीच घ्यावीशी वाटली

घेऊनी गेलो तीला मी जेव्हा
सुन्दर साथ दिली मज तीने तेंव्हा
तीच्यासंगे सर्वत्र फ़िरताना
ओढ लागली मला तीची बागडताना

वाऱ्याबरोबर लागे तीची शर्यत
मनमोहक अशी तीची चाल

पहाताच क्षणी कोणीही म्हणेल
च्यायला काय दिसते याची माल!

स्तुती करण्याकरीता शब्द नाही
एवढी आवडली ती मज फ़ार
स्वप्नात् मला जी भेटली होती
प्रत्यक्षात कधी मिळेल मज ती "मर्सिडीज कार"



No comments:

Post a Comment