मित्रा,हल्ली एकटासाच राहु लागलोय,गप्प बसुन सगळे ऎकु लागलोय,का कुणास ठाऊक मी कविता करु लागलोय!मित्रा,हल्ली स्वतःशीच बोलू लगलोय,कुणाशी बोलायला घाबरु लागलोय,का कुणास ठाऊक मी कविता करु लागलोय!मित्रा,रात्री उगाचच विचार करु लागलोय,मधेच काही आठवले तर मोबाईल वर टाईप करु लागलोय,का कुणास ठाऊक मी कविता करु लागलोय!मित्रा,काहीतरी वेगळच वाटु लागलय,ना सुःख आलयं, ना दुःख गेलयं,का कुणास ठाऊक मी कविता करु लागलोय!मित्रा,एक मोठा अपघात झालाय,बाकी सगळं ठीक आहे; ह्रुदय मात्र दुखावलय,म्हणुनच की काय मी कविता करु लागलोय
No comments:
Post a Comment